झारीतील शुक्राचार्य
आज पुण्यनगरी ४ येथे झारीतील शुक्राचार्य पंथाच्या पर्यावरणी देवीचा श्री क्षेत्र रिकामटेकडी येथे मोठा उत्सव आहे तरी देवीच्या अतिप्रिय भक्तांनी संगणकावरून आपापसात नरेंद्र मोदी व भाजपमधील इतर नेते आणि महानगरपालिकेचे सर्व अधिकारी हे कसे मूर्ख आहेत आणि ते सारखे कशा चुका करतात या पद्धतीचे संभाषण करून साजरा करावा अशी देवीच्या स्वयंघोषित पंड्यांची सूचना आहे. देवीच्या अतिप्रिय भक्तांची लक्षणे पुढीलप्रमाणे : १. एखाद्या विषयात तज्ञ् असल्यामुळे आपण सगळ्या विषयात तज्ञ् हा पूर्वग्रह लागतो २. सामाजिक कार्य या विषयात प्राविण्य, एखाद्या खाजगी धंद्याचे मालक किंवा हिंजवडीमधील एखाद्या हमाल पुरवणाऱ्या महाप्रचंड कंपनीमध्ये वरिष्ठ पद लागते ३. भयंकर प्रदूषण करणाऱ्या डिझेल या इंधनावर चालणारी भलीमोठी गाडी लागते ४. सोशल मीडिया वर झपाझप मोदी आणि सरकारविरोधी मते मांडण्याचे आणि ते पुढे ढकलण्याचे कसब अतिशय महत्वाचे आहे ५. वर्क फ्रॉम होम ही काम करण्याची एकमेव पद्धत असली पाहिजे ६. टिम्बक्टू येथील सरकारने केलेली वाहतूक उपाययोजना ही जगात कशी सर्वोत्तम व पुण्यासाठी सर्वात योग्य हे कुठलाही अभ्य...